जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत 
भीमाशंकर शेतसंदी प्रथम
जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी प्रथम

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी प्रथम

sakal_logo
By

85977
आचरा ः जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर.

जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत
भीमाशंकर शेतसंदी प्रथम
आचरा, ता. २८ ः श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या वाचक स्पर्धेत भीमाशंकर शेतसंदी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मधु मंगेश कर्णिक यांच्या कोणत्याही पुस्तकावर १० ते १५ मिनिटे समीक्षणात्मक बोलणे या विषयावर आयोजित या स्पर्धेत ऋतुजा केळकर यांनी द्वितीय, तर तृतीय क्रमांक उज्वला धानजी यांनी मिळविला. उत्तेजनार्थ श्रद्धा सांबारी यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, उर्मिला सांबारी, अशोक कांबळी, भिकाजी कदम, दीपाली कावले, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीच्या भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, श्रद्धा महाजनी, गोट्या आचरेकर, कर्मचारी महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण सुरेश गावकर, श्री. फर्नांडिस यांनी केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रसाद ठाकूर यांनी वडील (कै.) दादा ठाकूर यांच्या स्मरणार्थ शालांत परीक्षेत मराठी विषयात जास्त गुण मिळविलेल्या आचरा गावातील पाच विद्यार्थ्यांना संस्थेचे आजीव सभासदत्व मिळवून दिले. या आजीव सभासदत्व योजनेचे हे पाचवे वर्ष असून या योजनेंतर्गत ठाकूर कुटुंबीयांनी आतापर्यंत २५ विद्यार्थ्यांना संस्थेचे आजीव सभासदत्व मिळवून दिले आहे.