Sun, May 28, 2023

हातभट्टीची दारू विक्रेत्यावर कारवाई
हातभट्टीची दारू विक्रेत्यावर कारवाई
Published on : 28 February 2023, 2:36 am
हातभट्टीची दारू विक्रेत्यावर कारवाई
रत्नागिरी ः शहराजवळी चंपक मैदान येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सदाशिव टिळेकर (वय ४९, रा. मच्छीमाक्रेट, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महोश हा चंपक मैदान येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची २५० रुपयांची ५ लिटर दारू स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार स्वाती राणे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.