लोककला समिती सदस्यांचा ''पंचम खेमराज''तर्फे सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोककला समिती सदस्यांचा ''पंचम खेमराज''तर्फे सन्मान
लोककला समिती सदस्यांचा ''पंचम खेमराज''तर्फे सन्मान

लोककला समिती सदस्यांचा ''पंचम खेमराज''तर्फे सन्मान

sakal_logo
By

swt18.jpg
86074
सावंतवाडीः येथील पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे लोककला समिती सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

लोककला समिती सदस्यांचा
‘पंचम खेमराज’तर्फे सन्मान
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासन लोककला अनुदान शिफारस समिती सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांसह दशावतार लोककला जतन करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत-भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत-भोसले यांच्या हस्ते त्यांना शाल, चिन्ह, श्रीफळ, देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील लोककलावंतांच्या पथकांना भांडवली खर्चासाठी प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी लोककला अनुदान शिफारस समितीची स्थापना केली आहे. या समितीवर सदस्यपदी नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक तुषार नाईक व चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक देवेंद्र नाईक यांची निवड झाली आहे. महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचे संचालक गौरव शिर्के यांना कला व सांस्कृतिक संचलनालय गोवा यांच्यावतीने राष्ट्रीय दशावतार म्हणून गौरविण्यात आले. या तिघांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित दशावतार चालक-मालक संघटनेचे सचिव सचिन पालव यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे सदस्य डॉ. सतीश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्रा. डी. डी. गोडकर, प्रा. एम. ए. ठाकूर, प्रा. एन. डी. धुरी, डॉ. बी. एन. हिरामणी, डॉ. डी. जी. बोर्डे, डॉ. एस. एम. बुवा आदी उपस्थित होते.