वेंगुर्लेकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
वेंगुर्लेकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

वेंगुर्लेकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन

sakal_logo
By

swt13.jpg
86069
पणदूरः पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

वेंगुर्लेकर महाविद्यालयात
मराठी भाषा गौरव दिन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज जयंती तसेच मराठी भाषा गौरव दिन सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
सुरुवातीला प्राचार्य डॉ. शिंदे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एस.वाय.आय.टी.च्या चमुने कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ''सर्वात्मका शिवसुंदरा'' ही प्रार्थना म्हणून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात केली. ग्रंथपाल सुशांत वालावलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविकामधून त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विषद केले. मराठी भाषेचा जागर करण्यासाठी महाविद्यालयातील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी मराठीतील उत्तम कविता, नाटकांमधील स्वगत तसेच मराठी भाषेची थोरवी सांगणारी विविध गीते सादर करून कार्यक्रम बहारदार केला. प्रा. शिंदे यांनी मराठी भाषेचा इतिहास, विविध बोलीभाषा तसेच साहित्यिक वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्याचा परिचय करून दिला. ओव्या आणि कविता चालीत म्हटल्यास त्या अधिक भावतात, असे सांगत काही मुखोद्गत कविता चालीत म्हणून दाखविल्या. ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा. भाग्यश्री गावडे, प्रा. स्मिता परब, प्रा. तन्वी सिंघन उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संचिता कोलापटे यांनी केले. प्रा. प्रथमेश गोसावी यांनी आभार मानले.