
मावळंगेतील शिबिरात 34 लोकांचे रक्तदान
rat०११०.txt
बातमी क्र. १० (टुडे पान ४ साठी)
फोटो ओळी
-rat१p१४.jpg-
८६०८७
रत्नागिरी ः मावळंगेतील रक्तदान शिबिरावेळी दात्यांना प्रमाणपत्र देताना प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
--
मावळंगेतील शिबिरात ३४ लोकांचे रक्तदान
पावस, ता. १ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये ३४ लोकांनी रक्तदान केले.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक क्रीडा कला या विविध क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून गावामध्ये युवकांना नवीन व्यासपीठ मिळवून दिले आहे. समाजात वावरत असताना विविध अडीअडचणीचा सामना करावा लागतो. अनेक गरीब लोकांना रक्ताची आवश्यकता असते. त्यांना त्वरित रक्त मिळावे यासाठी कार्यकर्त्यांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिल्यामुळे दरवर्षी रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.