चित्रफितीतून शेतकऱ्यांना भरडधान्य विषयक मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रफितीतून शेतकऱ्यांना भरडधान्य विषयक मार्गदर्शन
चित्रफितीतून शेतकऱ्यांना भरडधान्य विषयक मार्गदर्शन

चित्रफितीतून शेतकऱ्यांना भरडधान्य विषयक मार्गदर्शन

sakal_logo
By

rat०११८.txt

बातमी क्र.. १८ (टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
- rat१p६.jpg-
८६०६२
लांजा ः वेरळ येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित ''कृषी महिती तंत्रज्ञान केंद्र'' व प्रदर्शनाला उपस्थित सरपंच सुवर्णा जाधव, तहसीलदार प्रमोद कदम, तालुका कृषी अधिकारी सविता मेहेर आदी.
---
चित्रफितीतून शेतकऱ्यांना भरडधान्याची माहिती

कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी ः कर्ज योजनांचीही दिली माहीती

लांजा, ता. १ ः भरड धान्यविषयक दापोली विद्यापीठाने तयार केलेल्या चित्रफितीद्वारे वेरळ (ता. लांजा) गावातील शेतकऱ्यांना मातीपरीक्षण, लागवड, औषधांचा वापर, शेतीसंबंधित कर्जयोजना यांसह शेतीला लागणारी यंत्र याची सविस्तर माहिती दापोली कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी आयोजित प्रदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना दिली.
दापोली कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी ''रावे'' उपक्रमांतर्गत वेरळ गावामध्ये कार्यरत असून राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेत शेतकऱ्यांसाठी ''कृषी महिती तंत्रज्ञान केंद्र'' व प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच सुवर्णा जाधव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला तहसीलदार प्रमोद कदम, तालुका कृषी अधिकारी सविता मेहेर, कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद हनुमंते, कृषी सहाय्यक राम देवकर, मुख्याध्यापक प्रभाकर चव्हाण उपस्थित होते. जागतिक भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून विविध रंगीत तक्ते ''कृषक सोबती'' गटाच्या विद्यार्थी विनय भेरे, आदित्य देशमुख, प्रथमेश जाधव, अनिरुद्ध रेडिज, तलहा अराई, अनिकेत नालगोंडा, शुभम पारकर, प्रविर देसाई व ओमकेश पेडणेकर यांनी प्रदर्शनात मांडले होते. दापोली विद्यापीठाने तयार केलेली भरडधान्य चित्रफित दाखवण्यात आली. त्यासोबतच बीज उगवणी चाचणी, बिजांचे वर्ग व विविध विकसित जाती दाखवणे, मातीपरीक्षण कसे करावे, ट्रायकोडर्माचा व रायझोबियम वापर, बॉर्डो मिश्रणाचे प्रात्यक्षिक, अझोलाचा वापर, लम्पी रोगाविषयी माहिती, विविध कीटक सापळे म्हणजेच कामगंध सापळा, चिकट सापळा, रक्षक सापळा, अळंबी उत्पादन, शेतीसंबंधी कर्ज व योजना, शेतीला लागणारी यंत्रणे याविषयी माहितीचे तक्ते व प्रदर्शन तयार केले होते.