एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

rat०११९.txt

बातमी क्र..१९ (टुडे पान ४ साठी)

फोटो ओळी
- rat१p४.jpg ः
८६०६०
रत्नागिरी ः कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण शिक्षणसंस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये आणि अन्य.
----
हेगशेट्ये महाविद्यालयात काव्य वाचन स्पर्धा

रत्नागिरी, ता. १ ः वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या रत्नागिरीतील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी व ग्रंथालय विभागातर्फे वरिष्ठ महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाचस्पती आणि काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. या दिनानिमित्त ग्रंथालय विभागातर्फे घेण्यात आलेल्या वाचस्पती स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयातील रवनी मीना हिने (प्रथम), सिमरन भायजे (द्वितीय), ऋतुजा नाटळकर (तृतीय) यांनी यश मिळवले. तर कनिष्ठ महाविद्यालयातील मृणाली तांबे (प्रथम), सोनाली रामगडे (द्वितीय) तर मानसी बाईंग (तृतीय) यांनी यश मिळवले. या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती दिली. या प्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अनुजा पावसकर तर आभार ऋतुजा नाटेकर या विद्यार्थिनीने मानले.