
सावर्डे ः सामाजिक संस्था, खेळाडूंचा गौरव
rat०१२०.txt
बातमी क्र.. २० (टुडे ४ साठी)
(टीप- तीन पानांची पुरवणी होती, बातमी अत्यावश्यक)
फोटो ओळी
- rat१p७.jpg ः
८६०६३
सावर्डे ः कोंडमळा, अडरेकर मोहल्ला येथील गरजू मुलींना सायकल वाटप करताना आमदार शेखर निकम.
- rat१p८.jpg ः
८६०६४
देवरूखच्या सह्याद्री संकल्प सोसायटीचे सचिव डॉ. प्रताप नाईकवडे, संगीता खरात, प्रतीक मोरे, कुणाल अणेराव सह्याद्री पुरस्कार आमदार शेखर निकम यांच्या हस्ते स्वीकारताना.
--
सामाजिक संस्था, खेळाडूंचा गौरव
आमदार निकम वाढदिवस ः सावर्डेत शैक्षणिक वस्तूंचे वाटप
सावर्डे, ता. १ ः चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सामाजिक संस्था, खेळाडू, विद्यार्थी गौरव कार्यक्रमासह शैक्षणिक वस्तूचे वाटप करण्यात आले.
या वेळी आमदार शेखर निकम, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के, माजी सभापती पूजा निकम, सह्याद्री संकल्प सोसायटी देवरूख संस्थेचे सचिव डॉ. प्रताप नाईकवडे, मीनल काणे आदी उपस्थित होते. देवरूख सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेला सह्याद्री पुरस्कार आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम व मानाचे सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. भिले-ब्राह्मणवाडी शाळा, वांझोळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला संगणक संच भेट देण्यात आला. स्वराज जोशी, अमोल टाकळे यांचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे विद्यालयातील विद्यार्थी स्वराज जोशी याची ३ हजार मीटर धावणे शालेय स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर निवड झाली. याबद्दल आणि राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कर विजेते अमोल टाकळे यांचा गौरव करण्यात आला. माजी सभापती पूजा निकम यांच्या निधीतून सावर्डे-कोंडमळा या दोन्ही धनगरवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी सबमर्सिबल पंप, सावर्डे, कोंडमळा, अडरेकर मोहल्ला येथील गरजू आठ मुलींना सायकल, सावर्डे उर्दू शाळेसाठी संगणक कक्ष, आगवे गावातील गुरववाडी व मधलीवाडी या दोन अंगणवाडीसाठी कपाट यांचे वितरण करण्यात आले.
-