रत्नागिरी ः  फळाच्या राजाला वातावरणाचा ताप

रत्नागिरी ः फळाच्या राजाला वातावरणाचा ताप

फोटो ओळी
- rat1p17.jpg-KOP23L86096
रत्नागिरी ः तालुक्यातील मजगाव येथील राजेंद्र कदम यांच्या बागेतील लगडलेल्या कैर्‍या.
- rat1p18.jpg-KOP23L86097
शेवटच्या टप्प्यातील मोहोर
- rat1p19.jpg- KOP23L86098
काही झाडांना आलेली पालवी
- rat1p20.jpg-KOP23L86099
उन्हामुळे गळून गेलेला आंबा
- rat1p21.jpg-KOP23L86100
उन्हामुळे आंब्याच्या आतील भाग खराब झाला
- rat1p22.jpg- P23L86101
बाजारात पाठवण्यासाठी काढलेला आंबा
- rat1p23.jpg- KOP23L86102
आंब्यांनी लगडलेले झाड
- rat1p24.jpg- KOP23L86103
औषध फवारणी करताना कामगार


----------
ग्राऊंड रिपोर्ट----------लोगो

इंट्रो
रत्नागिरी ः वातावरणात सातत्याने होणारे बदल हापूस आंब्यासाठी मारक ठरले आहेत. उशिरापर्यंत थांबलेला पाऊस, त्यानंतर पालवी जून झाली नसल्यामुळे पहिल्या टप्प्यात 15 टक्केच आलेला मोहोर, जानेवारीच्या अखेरीस पंधरा दिवस पडलेल्या थंडीत मोहोर आला; पण पुढे पडलेल्या कडाक्याच्या उन्हाने झालेली फळगळ, अशा अनेक संकटांचा सामना करत. आंबा बागायतदारांची वाटचाल यंदाच्या हंगामात सुरू आहे. मार्च महिना आला तरीही पहिल्या टप्प्यातील अपेक्षित उत्पादन बागायतदाराच्या हाती आलेले नाही. यंदाचा हंगाम एप्रिलच्या अखेरीस राहील अशी अटकळ बांधली जात आहे. शेवटच्या टप्प्यात एकाचवेळी आंबा बाजारात दाखल झाला तर दर किती मिळणार ही चिंता सतावत आहे. भविष्यातील अंदाज बांधत आंबा व्यावसायिकांनी फळे बाजारात पाठवण्याची जय्यत तयारी केली आहे. आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांच्यासह आणखी काहीजणांशी संवाद साधल्यानंतर उभे राहिलेले चित्र.
- राजेश कळंबटे, रत्नागिरी
---------------

हापुसची लढाई वातावरणाशी

पहिल्या टप्प्यात 15 टक्केच मोहोर ; सेटिंग कमी, थ्रिप्स, फळमाशीचा धोका

कोकणाची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या हापूसला फयान चक्रीवादळापासून ग्रहण लागलेले आहे. दरवर्षी वातावरणातील बदलांना सामोरे जावे लागत आहे. संवेदनशील हापूसवर वातावरणाचा परिणाम अधिक होत आहे. यंदा सुरवातीलाच 22 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दरवर्षीच्या तुलनेत यंदा 90 टक्के झाडांना पालवी आली होती. पालवी जून होण्यासाठी पोषक वातावरण पुढे तयार होईल, अशी आशा होती; परंतु ती फोल ठरली. डिसेंबर महिन्यातही वातावरणातील बदल होतेच होते. परिणामी, पालवी जून होण्यास विलंब झाला. मोहोर आलेल्या झाडांचा टक्का 10 ते 15 च होता.

* हापूसची आजची स्थिती.
गेल्या 15 दिवसात पारा 37 अंशावर गेला होता. परिणामी, उन्हामुळे आवळ्याच्या आकाराहून थोडी मोठी कैरी गळून गेली. उन्हाच्या दिशेने असलेल्या फळाला चट्टे पडले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पादनालाही फटका बसला. तयार झालेला आंबा काढण्यासाठी बागायतदारांकडून घाई सुरू झाली असून, बाजारात कमी तयार झालेली फळं पाठवण्यास सुरवात झाली. उन्हाचा कडाका कायम असून, फळं वेगाने तयार होत आहेत. शेवटच्या टप्प्यातील मोहोर येण्याची प्रक्रिया पूर्णतः थांबली आहे. सेटिंग कमी होत असल्याने एप्रिल, मे महिन्यातील उत्पादनही कमी राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

* असे असेल हंगामाचे चित्र
फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात वाशी बाजारात दाखल होत असलेल्या पेट्यांमध्ये सात टक्केच पेट्या रत्नागिरी हापूसच्या आहेत. सर्वसाधारणपणे रत्नागिरी हापूस 15 मार्चनंतर मोठ्या प्रमाणात जाऊ लागेल. सुमारे आठ ते दहा हजार पेटी आंबा या कालावधीत रत्नागिरीतून रवाना होईल, अशी शक्यता आहे. 15 एप्रिलपर्यंत हा ओघ राहील. पुढे 15 दिवस बाजारात हापूसची आवक कमी राहील. शेवटच्या टप्प्यात आलेल्या मोहोराचे उत्पादन 10 मे नंतर मिळेल.

* ही आहेत आव्हाने

यंदा उष्णता अधिकाधिक राहण्याची शक्यता असल्याने उन्हामुळे निर्माण होणार्‍या समस्यांना सामोरे जाण्यासाठी बागायतदारांना तयारी करावी लागणार आहे. झाडांना पाणी देणे, फळांचे प्रखर उन्हापासून संरक्षण करणे, काढणीचे वेळापत्रक तयार करणे या गोष्टी कराव्या लागतील. वातावरणातील बदलांमुळे सध्या थ्रिप्सचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्याला आवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधे फवारणी सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळत नसल्याने बागायतदार हतबल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे तुडतुडाही वाढू शकतो तर शेवटच्या टप्प्यात फळमाशीचे आव्हान राहणार आहे. 15 मे नंतर अवकाळी पावसाची शक्यता असते. त्या कालावधीतच बरेचसं उत्पादन मिळणार असल्याने फळमाशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

* बाजारातील दर स्थिती
वाशी बाजारामध्ये विविध ठिकाणाहून सुमारे 11 हजार पेटी आंबा दाखल होत आहे. त्यात हापूसच्या पेटीला आठ ते साडेआठ हजार रुपये दर मिळत आहे. फळाच्या दर्जानुसार हा दर ठरवला जात आहे. सुरवातीला चांगला पाच डझनच्या पेटीला चांगला दर आहे. देवगडमधून सर्वाधिक तर राजापूर, रत्नागिरीसह आजुबाजूच्या परिसरातून किरकोळ पेटी आंबा पाठवला जात आहे. आवक वाढली तर दर हळूहळू कमी होत जाणार आहे.

कोट
वातावरणातील बदलांमुळे सुरवातीचा आंबा तयार होत आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. हळूहळू आवक वाढणार आहे; परंतु नव्याने आलेल्या मोहोराचे सेटिंग कमी होत असून वांझ मोहोर अधिक आहे.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

कोट
सध्या आंब्याच्या किरकोळ पेट्या बाजारात जात आहेत. दरही चांगला मिळतोय. 15 मार्चपर्यंत पेट्या वाढत जातील.
- विशाल सरफरे, राजापूर

कोट
भविष्यात तुलनेत तापमान दोन डिग्रीने अधिक राहण्याची शक्यता आहे. बागायतदारांनीही त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहिले पाहिजे. फळ सुरक्षित ठेवण्यासाठी बॅग लावणे, चुन्याची निवळी मारणे, झाडांना पाणी देणे यासारखे उपाय केले पाहिजेत.
- डॉ. वैभव शिंदे, अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com