रविवारी मोफत तपासणी शिबीर

रविवारी मोफत तपासणी शिबीर

rat०१५.txt

बातमी क्र.. ५ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)
(टीप- जाहिरातदार आहे.)

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये
रविवारी मोफत तपासणी शिबिर

रत्नागिरी ः कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर येत्या रविवारी (ता. ५) आयोजित केले आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत शिवाजीनगर-आयटीआय मार्गावरील धन्वंतरी रुग्णालयात शिबिर होईल. यात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. सन २०१४ मध्ये सुरू झालेल्या कोकणातील पहिल्या अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्युब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील धन्वंतरी रुग्णालयात डॉ. शिंदे या मोफत तपासणी शिबिर घेत असतात. या शिबिरामध्ये माता आणि पिता होण्यासाठी इच्छुक जोडप्यांना टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाणार आहे. त्याशिवाय पीसीओडी संदर्भातील समस्या, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, लैंगिक समस्यांवर डॉ. शिंदे मोफत मार्गदर्शन करणार आहेत.
--

दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञानदिन

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित धोंडीराम शेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात विज्ञानदिन उत्साहात साजरा केला. हा दिवस सी. वी. रमण यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. मुख्याध्यापिका समिक्षा पिटले यांनी सी. वी. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांची माहिती, विज्ञान कविता, दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्व या विषयी माहिती दिली. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती तयार केल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थी अध्याय सकपाळ याने केले. सहाय्यक शिक्षिका विद्या भिंगे यांनी विज्ञानदिनाचे महत्व सांगितले. पिटले यांनीही विज्ञानाची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरी बापट, प्रांजल सुर्वे, स्वप्नाली रहाटे, सोनल शिंदे, सेजल कदम, धीरज निगडे यांनी विशेष मेहनत घेतली.
--

दोन एक्स्प्रेस गाड्यांना एक डबा वाढवला

पावस : कोकणात होळीसाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या दोन एक्स्प्रेस गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्ग धावणारे हापा मडगाव तसेच पोरबंदर कोचुवेली या दोन एक्स्प्रेस गाड्यांना होळी सणासाठी स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात येणार आहे. हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला १ मार्चपासून, तर मडगाव ते हापा दरम्यान धावणाऱ्या फेरीला ३ मार्चसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. तसेच पोरबंदर ते कोचुवेली या गाडीला २ मार्चसाठी आणि या गाडीच्या परतीच्या प्रवासात कोचवेळी ते पोरबंदर या फेरीसाठी ५ मार्चला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com