शिक्षक, शिक्षकेतरांचा 14 पासून बेमुदत संप

शिक्षक, शिक्षकेतरांचा 14 पासून बेमुदत संप

शिक्षक, शिक्षकेतरांचा
१४ पासून बेमुदत संप
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः शासकीय, निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाची पूर्वतयारी करण्याकरिता राज्य पदाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा गुरुवारी (ता. २) आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद आणि स्पॉट नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२ वाजता होणार आहे. तसेच विविध कार्यालय संवाद सभा आयोजित केली आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदीप नागे (सहसचिव, कोकण विभाग), उपेंद्र शिवळकर (संघटक, कोकण विभाग), प्रकाश पाटील (सल्लागार), राजन कोरगावकर (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती) उपस्थित राहणार आहेत. सर्व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सभासद नोंदणी करावी. संपाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व पदाधिकारी व प्रत्येक कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती तथा निमंत्रक समन्वय समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सत्यवान माळवे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com