सेवानिवृत्त शिक्षकांचा मालवणात 5 ला स्नेहमेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त शिक्षकांचा
मालवणात 5 ला स्नेहमेळा
सेवानिवृत्त शिक्षकांचा मालवणात 5 ला स्नेहमेळा

सेवानिवृत्त शिक्षकांचा मालवणात 5 ला स्नेहमेळा

sakal_logo
By

सेवानिवृत्त शिक्षकांचा
मालवणात रविवारी स्नेहमेळा
मालवण, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवणच्या वतीने तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांचा एकत्रित स्नेहमेळावा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली ५ मार्च रोजी दैवज्ञ भवन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या स्नेहमेळाव्यात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आपले कलागुण प्रदर्शित करणार आहेत. तसेच कणकवली येथील संगीत विशारद माधव गावकर यांच्या संगीत मैफिलीचा कार्यक्रम होणार आहे. या स्नेहमेळाव्यात उपस्थित सर्व शिक्षकांना डॉ. किरण गोसावी हे आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या स्नेहमेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, असोसिशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, प्रकाश दळवी, नारायण सावंत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरसुळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप बागवे, जिल्हा सहसचिव कृष्णा पाताडे, जिल्हा सदस्य तसेच सर्व तालुकाध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या स्नेहमेळाव्याला तालुक्यातीतील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, पदवीधर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका सरचिटणीस रुपाली पेंडुरकर, कोषाध्यक्ष सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष ज्ञानदेव ढोलम व श्यामसुंदर माळवदे, सहसचिव आनंद धुत्रे यांनी केले आहे.