मोती तलाव कठड्याचे काम
दर्जाहीन होत असल्याचा आरोप

मोती तलाव कठड्याचे काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप

८६०९०

मोती तलाव कठड्याचे काम दर्जाहीन
आशिष सुभेदार यांचा आरोप; बांधकामचे अधिकारी अनुपस्थित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः येथील संस्थानकालीन मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे सुरू असलेले काम निकृष्ट पद्धतीने होत असून कामाच्या ठिकाणी बांधकामचा कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझर उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ते काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून हे काम निविदेमध्ये समाविष्ट पद्धतीने करून घ्यावे; अन्यथा काम बंद पाडू, असा इशाराही मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
शहरातील मोती तलावात साचलेला गाळ काढताना तलावाचा संरक्षक कठडा कोसळला. नव्याने कठडा उभारण्याबाबत मनसे पक्षाने देखील पाठपुरावा करून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नंतर नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर प्रशासनाने हे काम हाती घेतले होते; मात्र गाळ काढण्याचे काम सुरू असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीला धोका पोहोचून ती कोसळली होती.
सद्यस्थितीत कोसळलेली भिंत हटवून नव्याने बांधण्यात येत आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर असून पुणे येथील कंपनी हे काम गेले काही दिवस करीत आहे. हे काम होत असताना त्या ठिकाणी बांधकामचे जबाबदार अधिकारी उपस्थित असणे गरजेचे आहे; मात्र कामाच्या ठिकाणी बांधकामचा कोणीही अधिकारी उपस्थित राहत नाही. सध्या संरक्षक भिंत उभारण्यात आल्यानंतर त्याला पाणी मारण्यास टाळाटाळ केली जात आहे. बांधकामचा जबाबदार अधिकारीच उपस्थित राहत नसल्यामुळे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च होणार असल्याने या भिंतीचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे. दर्जाहीन काम झाल्यास भविष्यात पुन्हा कठडा कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे बांधकामचे कार्यकारी अभियंता यांनी जातीने लक्ष देऊन हे काम दर्जेदार करून घ्यावे. तसेच त्या ठिकाणी बांधकामचा जबाबदार अधिकारी तैनात ठेवून त्याच्या देखरेखीखाली हे काम व्हावे; अन्यथा नागरिकांना घेऊन काम बंद पाडण्यात येईल येईल, असा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com