शिवाजी स्कूलमध्ये भाषा दिन साजरा

शिवाजी स्कूलमध्ये भाषा दिन साजरा

शिवाजी स्कूलमध्ये भाषा दिन साजरा
कणकवलीः येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी भाषा दिन अभिनेते अभय खडपकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यामध्ये २०२२-२३ मध्ये काळाच्या पडद्याआड झालेले साहित्यिक, गायिका, अभिनेते यांना आदरांजली वाहण्यात आली. बाल शिवाजी इंग्लिश मीडिअम स्कूलच्या भव्य पटांगणात ढोल लेझीमच्या तालावर ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी नृत्य, भाषण या कला सादर केल्या. अभिनेते अभय खडपकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, मुख्याध्यापक कृष्णा जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रणाली किसन ठोंबरे व चैत्राली सुरेश काकडे यांनी केले.
---------------
बाल‌ शिवाजीमध्ये विज्ञान दिन साजरा
कणकवलीः येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. युरेका सायन्स सेंटरच्या संचालिका सुषमा केनी यांच्या उपस्थितीत विज्ञान याविषयी विविध विषयांवर मुलांशी संवाद साधण्यात आला. यावेळी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संस्थेच्या सचिव सुलेखा राणे यांनीही मुलांना विज्ञानदिनाचे महत्त्व सांगितले. खजिनदार रमेश राणे, मुख्याध्यापक कृष्णा जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन आर्या सावंत व दिशा पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com