ःमराठी भाषेच्यातीने बहारदार कविसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ःमराठी भाषेच्यातीने बहारदार कविसंमेलन
ःमराठी भाषेच्यातीने बहारदार कविसंमेलन

ःमराठी भाषेच्यातीने बहारदार कविसंमेलन

sakal_logo
By

rat०११२.txt

बातमी क्र. .१२ (पान २ साठी)

खरे- ढेरे महाविद्यालयात बहारदार कविसंमेलन

रत्नागिरी, ता. १ ः खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्यावतीने २७ फेब्रुवारी हा मराठी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ९ वा. कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रसिद्ध शाहीर शाहीद खेरटकर चिपळूण, प्रसिद्ध कवी राजेंद्र आरेकर गुहागर, प्रसिद्ध कवी ज्ञानेश्वर झगडे गुहागर उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने झाला. एकापेक्षा एक अशा सुंदर कविता मराठीच्या गौरवाच्या निमित्ताने सादर झाल्या. यात खेरटकर यांनी बहारदार आवाजात शाहिरी कविता सादर केल्या. यात ना मंदिराची ओढ ना मज्जीतिची ओढ ही कविता काळजाचा ठाव घेऊन गेली.
ज्येष्ठ कवी राजेंद्र आरेकर यांनी सुंदर, तरल, भावनाशील कविता सादर केल्या. यात ''आई'' या विषयावरच्या दोन कवितांनी अंतर्मुख केले. त्यांची धक्का तंत्रातली ''माझ्याच लेकरांची आई'' ही कविता हास्यविनोदाचे तुषार उडवून गेली. त्यांच्या बहारदार प्रेमकवितांनी चांगली रंगत आणली. कवी ज्ञानेश्वर झगडे यांनी ''आम्ही कोकणचं राजं हाय वनवासी'' ही कविता सादर केली. कोकणची व्यथा या कवितेतून मांडली. या कवितेवर रसिकांनी ताल धरला. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले.