राजापूर ःश्रमदानातून ग्रामस्थांनी केला अडीचशे मीटर रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःश्रमदानातून ग्रामस्थांनी केला अडीचशे मीटर रस्ता
राजापूर ःश्रमदानातून ग्रामस्थांनी केला अडीचशे मीटर रस्ता

राजापूर ःश्रमदानातून ग्रामस्थांनी केला अडीचशे मीटर रस्ता

sakal_logo
By

rat०१२४.txt

बातमी क्र..२४ (पान २ साठीमेन)

फोटो ओळी
-rat१p३०.jpg ः
८६१३७
राजापूर ः चुनाकोळवण-सुतारवाडीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे सुरू असलेले काम.
-rat१p३१.jpg ः
८६१३८
जेसीबीसाठी साहाय्य करणारे माजी पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर यांच्यासमवेत ग्रामस्थ.
--

श्रमदानातून ग्रामस्थांनी केला अडीचशे मीटर रस्ता

चुनाकोळवण-सुतारवाडीतील ग्रामस्थांची सोय ः वाहतूक होणार सुलभ

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः तालुक्यातील चुनाकोळवण-सुतारवाडीतील अमर विकास मंडळाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना ग्रामस्थांनी श्रमदानाची जोड देत सुतारवाडीकडे जाणारा सुमारे अडीचशे मीटर लांबीचा रस्ता केला आहे. या कामासाठी माजी पंचायत समिती सदस्य प्रतीक मटकर, लगतचे जागामालक यांचे सहकार्य लाभले असून या रस्त्यामुळे मुख्य रस्त्यापासून सुतारवाडीमध्ये सुरळीतपणे आता गाड्या जाणार आहेत.
चुनाकोळवण येथील सुतारवाडीकडे मुख्य रस्त्यापासून जाणारा सुरेश हिराजी मटकर घर ते गोपाळ पळसमकर घर हा रस्ता अनेक वर्षापासून वाहतुकीसाठी चांगला नव्हता. हा रस्ता व्हावा म्हणून सुतारवाडीतील अमर विकास मंडळ सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांना ग्रामस्थांनी श्रमदानाची जोड दिली. रस्त्यालगतच्या जागामालकांनीही जागा दिली. माजी पंचायत समिती सदस्य मटकर यांनी जेसीबी उपलब्ध करून दिल्याने मंडळासह लोकांच्या रस्ता करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ मिळाले. त्याच्यातून सुतारवाडीमध्ये जाणारा सुमारे अडीचशे मीटरचा रस्ता सुरळीत वाहतुकीच्यादृष्टीने झाल्याची माहिती सुतारवाडी येथील ग्रामस्थ संजय मटकर, राजेश राघव यांनी दिली.
लोकसहभाग आणि श्रमदानातून झालेल्या या रस्त्यामुळे मुख्य रस्त्यावरून सुतारवाडीमध्ये सहज वाहतूक करणे शक्य होणार आहे. या रस्त्याचा आरंभ माजी पंचायत समिती सदस्य मटकर आणि चुनाकोळवणचे सरपंच श्रीकांत मटकर यांच्या उपस्थितीत झाला. निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी सुतारवाडीतील ग्रामस्थ आणि अमर विकास मंडळाने श्रमदानातून रस्ता करून जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
--
सौरदिवेही लावले

रात्रीच्यावेळी लोकवस्तीमधून फिरणे सोयीचे आणि सुरक्षित व्हावे या दृष्टीने अमर विकास मंडळाच्या पुढाकाराने अडचणीच्या ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे दिवेही लावण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा लोकवस्तीतील रात्रीचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित झाला आहे.