संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१p३२.jpg -KOP२३L८६१५६ सौ. दर्शना कामेरकर
-----------

कथ्थक अलंकार परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग
रत्नागिरी : येथील यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीमध्ये कथ्थक या विषयाच्या अलंकार या परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग सुरू झाले असून मुंबई येथील सौ. दर्शना कामेरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दर महिन्याच्या महिन्याच्या शेवटच्या सोमवार आणि मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत हे वर्ग चालतील. पटवर्धन अकादमीमध्ये हार्मोनियम, तबला, कथ्थक, भरनाट्यम्, गायन आदी विविध विषयांचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय एप्रिल-मे आणि नोव्हेंबर-डिसेंबर सत्राच्या सर्व विषयांच्या शास्त्रीय संगीत परीक्षांचे केंद्रही चालवले जाते. कथ्थकच्या अलंकार पदवीसाठीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन अकादमीतर्फे हा वर्ग सुरू केला आहे. या वर्गाच्या प्रवेशाकरिता राधा भट यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.


‘मी सावरकर’स्पर्धेत
वडील-मुलगी देशात प्रथम
दाभोळ ः आझादी का अमृत महोत्सवांतर्गत स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित ''मी सावरकर'' या राष्ट्रीय स्पर्धेत दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील वडील व लेक मिलिंद व ऋजुता जोशी या दोघांनी सादर केलेल्या स्वा. सावरकर यांनी लिहिलेल्या पहिल्या संगीत उ:शाप नाटकातील तिसऱ्या अंकातील आठवा प्रवेश सादर करून अवघ्या भारत देशातून आलेल्या विविध स्पर्धकांतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण ५ मार्चला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विशेष कार्यक्रमात होणार आहे. या स्पर्धेकरिता दहा मिनिटाचे नाट्यवाचन रेकॉर्ड करून पाठवायचे होते. त्यानुसार मिलिंद आणि ऋजुता जोशी यांनी रेकॉर्डिंग पाठवले होते. हे त्यांचे नाट्यवाचन देशात सर्वोत्कृष्ट ठरले आहे.


भास्कराचार्य परीक्षेचा निकाल लवकरच ः बळवंतराव
दाभोळ ः शिक्षणक्षेत्रात आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवत इस्रो नासाच्या परीक्षा उपक्रमानंतर जिल्हा परिषद रत्नागिरीमार्फत फक्त जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दू शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी आणि दैनंदिन जीवनात गणिताचे उपयोजन करण्याच्यादृष्टीने कोण होणार आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य ही स्पर्धा परीक्षा २१ व २२ फेब्रुवारीला जिल्हाभरात झाली. दापोली तालुक्यातील २८ केंद्रातून तिसरी ते चौथी २ हजार ३८५ तर पाचवी ते सातवी २ हजार ७३९ अशा ५ हजार १२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, दापोली तालुक्यातील परीक्षाकेंद्रांना भेटी देत शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी दापोलीच्या नियोजनाचे कौतुक केले. जिल्हा नियोजनानुसार प्रत्येक केंद्रावर संचालक, समवेक्षक यांनी पेपर तपासणीचे काम नियोजनबद्ध काटेकोरपणे पार पडले आहे. लवकरच जिल्ह्यावरून अधिकृत निकाल सादर करण्यात येणार असल्याचे दापोली गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले.

फोटो KOP२३L८६१५७
- ratchl१३.jpg ः चिपळूण ः मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये ढोलताशाच्या गजरात काढण्यात आलेली ग्रंथदिंडी.
-------------
मंदारमध्ये ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडी

चिपळूण ः मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने मराठी भाषेच्या जागृतीसाठी ग्रंथदिंडी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मुख्य कार्यालय ते मंदार इंग्लिश मीडियम स्कूलदरम्यान ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंदार ओक उपस्थित होते. डॉ. विलास सावंत यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रंथ प्रदर्शन, गडकिल्ले, मराठी साहित्य व घोषवाक्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. राज्यगीत गायन, ग्रंथदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उत्तम उपक्रमाने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हीच कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना खऱ्या अर्थाने अर्पिलेली आदरांजली आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या विश्वस्त व बीएड प्राचार्या डॉ. वेदांती सावंत यांनी केले.
---------------------