तोंडवळी वरची शाळेत भरली ‘विज्ञान जत्रा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोंडवळी वरची शाळेत
भरली ‘विज्ञान जत्रा’
तोंडवळी वरची शाळेत भरली ‘विज्ञान जत्रा’

तोंडवळी वरची शाळेत भरली ‘विज्ञान जत्रा’

sakal_logo
By

86151
तोंडवळी ः येथील शाळेत आयोजित विज्ञान जत्रा उपक्रमात सहभागी विद्यार्थी.

तोंडवळी वरची शाळेत
भरली ‘विज्ञान जत्रा’

आचरा : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची या शाळेने शालेय स्तरावर विज्ञान जत्रेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक तत्त्वांवर आधारीत विविध प्रयोग सादर करून व त्या प्रयोगात मागील शास्त्रीय कारण स्पष्ट करून उपस्थितांना यातून संदेश देत विज्ञान जत्रेचा उद्देश सफल केला. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, घडलेल्या घटनेसंदर्भात त्या घटनेची कारण मिमांसा जाणून घेत त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, जे दिसते ते असेच का, हे उलगडून पाहता यावे, यासाठी या जत्रेचे आयोजन करण्यात आले. ‘विज्ञानाची दृष्टी वापरा’ही अंधश्रद्धा निर्मूलन लघु नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. सरपंच नेहा तोंडवळकर व उपसरपंच हर्षद पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अनन्या पाटील, मानसी चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश चव्हाण आदी उपस्थित होते. विद्यार्थी सुंदर रीतीने आपल्या साहित्याचे सादरीकरण करतात, असे गौरवोद्गार वासुदेव उर्फ नाना पाटील यांनी काढले. मुख्याध्यापिका शीतल माडये, पदवीधर शिक्षक राजेश भिरवंडेकर, परशुराम गुरव, रुपेश दुधे व अशोक डोंगळे यांनी परिश्रम घेतले.