पळसंब येथील अवजड 
वाहतूक तत्काळ थांबवा

पळसंब येथील अवजड वाहतूक तत्काळ थांबवा

८६१५३


पळसंब येथील अवजड
वाहतूक तत्काळ थांबवा
ग्रामस्थांची मागणी ः आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १ : पळसंब-द्विगीवाडी गावात चिरेखाण व्यावसायिकांच्या सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे या भागातील रस्त्यांची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. ही अवजड वाहतूक तत्काळ न थांबविल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मालवण तहसीलदारांना दिला आहे. याबाबत जानेवारीमध्ये महसूल प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
महसूलला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोईसुविधांपासून दुर्लक्षित अशा द्विगीवाडी भागात राहणारे ग्रामस्थ असून जयंतीदेवी मंदिर ते द्विगीवाडी जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर सध्या चिरेखाण व्यावसायिकांकडून चौदा ते सोळाचाकी वाहतूक सुरू आहे. या भागात चार चिरेखाणी असून त्या दिवसरात्र सुरू असतात. अवजड वाहनांतून होणाऱ्या वाहतुकीमुळे या भागात जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रोज दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार सुरू आहेत. या रस्त्यावरील अवजड वाहतूक तत्काळ थांबवून रस्ता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. तातडीने अवजड वाहतूक बंद न केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा द्विगीवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com