बचतगटातील महिलांना
मुणगेत साड्या वाटप

बचतगटातील महिलांना मुणगेत साड्या वाटप

८६१६९


बचतगटातील महिलांना
मुणगेत साड्या वाटप
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. १ ः यशस्विनी प्रतिष्ठान व संघर्ष मित्रमंडळ, आडबंदर-मुंबईचे अध्यक्ष आनंद मालाडकर यांच्यावतीने मुणगे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक १ मधील बचतगटातील महिलांना ग्रामपंचायत सदस्या रविना मालाडकर यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.
मालाडकर यांच्या वतीने मुणगे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक १ मधील आडबंदरवाडी, कारिवणेवाडी, आपईवाडी आणि वाघोळीवाडी येथील बचतगटातील महिलांना काल (ता. २८) साडी वाटप करण्यात आले. आपईवाडी येथे दुर्गा परब यांच्या घरी हा कार्यक्रम सरपंच साक्षी गुरव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मालाडकर, अंजली सावंत, माजी सरपंच सायली बागवे, एकता ग्रामसंघ अध्यक्षा सविता रुपे, सचिव आरती सावंत, कोषाध्यक्षा हर्षदा मुणगेकर, लिपिका अनुजा कारेकर, सीआरपी संजना मुणगेकर, संगीता मुणगेकर आदी उपस्थित होते. यावेळी सदाफुली व ब्राह्मण देव (कारिवणेवाडी), विठ्ठल, सिध्दी व मशेश्वर (आपईवाडी) आणि माऊली बचतगट वाघोळीवाडी या गटांतील महिलांसह माजी सरपंच बागवे, एकता ग्रामसंघ अध्यक्ष रुपे, सचिव सावंत, कोषाध्यक्षा मुणगेकर, लिपिका कारेकर, सीआरपी संजना मुणगेकर, संगीता मुणगेकर, चित्रा मुणगेकर, सरपंच साक्षी गुरव, साक्षी सावंत, ग्रामपंचायत सदस्या व प्रभाग सदस्या अंजली सावंत यांना साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दुर्गा परब यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com