
पावस-जुन्या कपड्यांपासून नवीन निर्मितीचा संदेश
फोटो ओळी
- rat१p३३.jpg -KOP२३L८६१६६ रत्नागिरी : पदयात्रेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक, सेविका आणि मुख्याद्यापक राकेश चव्हाण.
-----
जुन्या कपड्यांपासून नवीन निर्मितीचा संदेश
पोदार इंटरनॅशनल स्कूल ; परिवर्तन ड्राइव्हतून पर्यावरण वाचवण्यासाठी जागृती
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २ ः रत्नागिरी तालुक्यातील कुवारबावजवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये परिवर्तन ड्रायव्ह उत्साहात झाला. या शैक्षणिक सत्रातील सर्व कार्यक्रम आणि स्पर्धांची सांगता या परिवर्तन ड्राइव्ह द्वारे केली जाते. प्रत्येक वर्षी परिवर्तन ड्राईव्हची संकल्पना वेगवेगळी असते. यावर्षी संकल्पनेचा विषय होता फेब्रिक रिसायकल म्हणजे जुने झालेले कपडे टाकून न देता त्याद्वारे विविध वस्तू बनवून ते कापड पुन्हा उपयोगात आणणे म्हणजेच जुन्या कपड्यांपासून नवीन निर्मिती.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावपासून पदयात्रेने करण्यात आली. ही पदयात्रा क्रीडांगण ते संसारे गार्डन अशी काढण्यात आली. पदयात्रेत पाचवी ते नववीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले. पदयात्रेत पर्यावरण वाचवा, जुने कपडे फेकू नका त्यांची नवनिर्मिती करा असा संदेश विद्यार्थी फलकांद्वारे आणि घोषणांद्वारे देण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांनुसार विद्यार्थ्यांनी सुती कपड्यांची वेशभूषा करून रॅम्पवॉक केला आणि आधुनिक कपडे न घेता टिकाऊ कपड्यांचा वापर करण्याचा संदेश दिला. जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तूंची निर्मिती कशी करता येईल आणि कापड निर्मिती पर्यावरणासाठी कशी घातक आहे याविषयी नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पोदार प्रेपच्या विभागाने कठपुतळी नाट्याचे सादरीकरण केले. झुंबा डान्सने सर्व उपस्थितांत नवचैतन्य निर्माण झाले.
विद्यार्थ्यांनी जुन्या सुती कपड्यांपासून पायपुसणी, पिशव्या, मोबाईल कव्हर, शो-पीस, पेन स्टॅन्ड, अशा विविध वस्तू बनवल्या होत्या. त्याचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आली.
जुने कपडे गरजूंना द्या...
कार्यक्रमात मुख्याद्यापक राकेश चव्हाण यांनी पर्यावरण पूरक कपडे का वापरले पाहिजेत आणि कापड बनविण्यासाठी होणारे पर्यावरणाचे नुकसान याविषयी माहिती दिली. सर्वांना जुने झालेले कपडे टाकून न देता ते गरजूंना दान करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
-----------