खेर्डीतील आमदार चषक कबड्डी स्पर्धेत कादवड विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेर्डीतील आमदार चषक कबड्डी स्पर्धेत कादवड विजेता
खेर्डीतील आमदार चषक कबड्डी स्पर्धेत कादवड विजेता

खेर्डीतील आमदार चषक कबड्डी स्पर्धेत कादवड विजेता

sakal_logo
By

rat०१४५

बातमी क्र. .४५ (पान ५ साठी)
(टीप-जाहिरातदार आहेत)

फोटो ओळी
-rat१p४२.jpg ः
८६१८८
चिपळूण ः विजेत्या कादवड संघाला गौरवताना आमदार शेखर निकम व पदाधिकारी.
-rat१p४३.jpg ः आ
८६१८९

आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सन्मान करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
-----------

कबड्डी स्पर्धेत कादवड विजेता

सिद्धिविनायक कळकवणे उपविजेता ; आमदार निकमांचा वाढदिवस जल्लोषात

चिपळूण, ता. १ ः खेर्डी येथील राष्ट्रवादी युवक-युवती काँग्रेस आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना रंगतदार झाला. कालभैरव कादवड व सिद्धिविनायक कळकवणे यांच्यात अटीतटीत झालेल्या सामन्यात कादवड संघाने विजय मिळवला. या स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून कळकवणे संघाच्या शुभम कदम यास गौरवण्यात आले. दरम्यान, अंतिम सामन्यावेळीच आमदार शेखर निकम यांचा वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात साजरा करण्यात आला.
खेर्डी येथील राष्ट्रवादी युवक-युवती काँग्रेसच्यावतीने गेल्या वर्षापासून आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. खेर्डी बाजारपेठ येथील दाभोळकर मिलच्या मागील मैदानात गेल्या ३ दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील १६ नामवंत संघ सहभागी झाले होते. पहिला उपांत्यफेरीचा सामना विठलाई पिटलेवाडी व सिद्धिविनायक कळकवणे यांच्यात झाला. यात कळकवणे संघाने पिटलेवाडीवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. उपांत्यफेरीच्या दुसऱ्या सामन्यात बलाढ्य कादवड संघाला सागर कोंडमळा संघाने चिवट झुंज दिली. यामध्ये कादवड संघ अंतिम पोहोचला. कादवड व कळकवणे संघात झालेल्या अंतिम सामन्यात सुरवातीला कादवड संघाने ११ विरुद्ध २ अशी मोठी आघाडी घेतली होती. शेवटी कादवड संघाने (३० गुण) कळकवणे संघावर (२६) चार गुणांनी मात करत आमदार चषक पटकावला. या स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून कळकवणे संघाचा शुभम कदम, सर्वोकृष्ट चढाईपटू म्हणून कादवड संघाचा नईम चौगुले, सर्वोकृष्ट पकडीसाठी सागर कोंडमळा संघाचा शुभम हुमणे आणि शिस्तबद्ध संघ म्हणून सागर कोंडमळा यांना गौरवण्यात आले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी आमदार शेखर निकम यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.