
संक्षिप्त-मालवणात शनिवारी दशावतार नाट्यप्रयोग
मालवणात शनिवारी
दशावतार नाट्यप्रयोग
मालवण ः वायरी येथील अचानक मित्रमंडळातर्फे शनिवारी (ता. ४) रात्री १० वाजता वायरी तानाजी नाका येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मैदान येथे पार्सेकर दशावतार नाट्यमंडळांचा ''शंभूचे लग्न'' अर्थात ''तारकासुर वध'' हा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
वेंगुर्लेत आज
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः वेंगुर्ले-गाडीअड्डा येथील श्री तांबळेश्वर रिक्षा टेम्पो युनियन आणि मित्रमंडळातर्फे उद्या (ता. २) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त रात्री ९ वाजता श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार नाईकांचा
वर्देवासीयांशी संवाद
कुडाळ ः आमदार वैभव नाईक यांनी वर्दे गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील प्रश्न जाणून घेतले. येत्या काळात सर्व प्रश्न दूर करून गावातील विकासकामे पूर्णत्वास नेण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार नाईक यांच्या प्रयत्नांतून वर्दे-कुंभारवाडी येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेसाठी १ कोटी २३ लाख ६७ हजार रुपये मंजूर झाले. रविवारी याचे भूमिपूजन आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. विभाग संघटक संदीप सावंत, पप्पू पालव, युवासेना विभाग प्रमुख प्रदीप सावंत, बाळा कुंभार, शाखाप्रमुख सुनील सावंत, पोलिसपाटील सागर पालव, युवासेना शाखाप्रमुख संतोष सावंत, दिलीप सावंत, बंड्या सावंत, काजल सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.
कुशाली गुरव
वक्तृत्वात प्रथम
सावंतवाडी ः नेमळे पचक्रोशी शिक्षण संस्था, सावंतवाडी संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिनी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत येथील आरपीडी प्रशालेतील नववीची विद्यार्थिनी कुशाली गुरव हिने तृतीय क्रमांक पटकावला. तिला रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल तिचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक एस. पी. नाईक, पर्यवेक्षक ए. व्ही. साळगावकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.