Sun, May 28, 2023

कणकवली :मोबाईल चोरीस
कणकवली :मोबाईल चोरीस
Published on : 1 March 2023, 2:47 am
कणकवलीत बसमध्ये चढताना
विद्यार्थिनीचा मोबाईल चोरीस
कणकवली, ता. १ ः येथील महाविद्यालयातील तालुक्यातील बारावीची परीक्षा देऊन घरी जात असताना विद्यार्थिनीचा मोबाईल चोरीस गेला आहे. हा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या सुमारास बस स्थानकावर घडला. याप्रकरणी विद्यार्थिनीने येथील पोलिसांत तक्रार दिली आहे. बारावी विज्ञान शाखेत शिकणारी मुलगी देवगडकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होती. यावेळी मागील एका संशयिताने तिच्या दप्तरातील मोबाईल लांबवल्याचे बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस उशिरापर्यंत तपास करून गुन्हा दाखल करणार आहेत. बस स्थानकावर नेहमी प्रवाशांना चोरांपासून सावध राहण्याच्या सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, प्रवाशांच्या दुर्लक्षामुळे असे चोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत.