
क्राईम पट्टा
पान ३ साठी
गावखडीतील दारूधंद्यावर धाड
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गावखडी भंडारवाडी येथील एका मोकळ्या जागेत आडोशाला हातभट्टीची दारू विकताना सापडून आल्याने तिच्याकडून हातभट्टीची दारू रोख रक्कम व साहित्य पकडण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी भंडारवाडी येथे सुधा सुहास पाटील (४८) या बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू विकत असताना त्याची खबर लागल्याने पूर्णगड पोलिस ठाण्याच्या महिला अंमलदार रेहना नाझीर नावलेकर यांनी २८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. धाड टाकून तिच्याकडे रोख रक्कम साहित्य पकडले. तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कळंबणी खुर्द येथे दारूधंद्यावर धाड
खेड ः तालुक्यातील कळंबणी खुर्द-टाकेचीवाडी येथे गावठी हातभट्टीचा दारूअड्डा सुरू असल्याची कुणकूण लागताच येथील पोलिसांनी छापा टाकून रसायन जप्त केले. या प्रकरणी संतोष काशिराम जाधव याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबणी खुर्द-टाकेचीवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीचा दारूअड्डा सुरू होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच अचानक धाड टाकली. या धाडीत गावठी हातभट्टीच्या दारूच्या रसायनासह अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली.