दळवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दळवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव
दळवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव

दळवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

टीपः swt१२२.jpg मध्ये फोटो आहे.
तळेरे ः रमाकांत वंजारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

दळवी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गौरव
तळेरे : कणकवली महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उड्डाण महोत्सवात अंतर्गत पथनाट्य स्पर्धेत येथील दळवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याबाबत महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे भारतीय रिझर्व बँकेचे निवृत्त वरीष्ठ अधिकारी रमाकांत वंजारे, सिंधुदुर्गातील प्रथितयश दिग्दर्शक शेखर गवस यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. वंजारे यांनी निश्चितच हे विद्यार्थी भविष्यात महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडतील, असा विश्वास व्यक्त केला. गवस यांनी महाविद्यालयाचे माजी मार्गनिर्देशक विनायक दळवी यांचे कौतुक करून महाविद्यालयासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. प्रा. हेमंत महाडिक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नरेश शेटे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी सृष्टी वाडेकर हिने आभार मानले.