पंधरा दिवसात 15 हजार घनमीटर गाळ उपसा

पंधरा दिवसात 15 हजार घनमीटर गाळ उपसा

rat०१४७g.txt

बातमी क्र. ४७ (पान १ साठी)

फोटो ओळी
- ratchl१८.jpg ः
८६२१३
चिपळूण ः पेठमाप येथे करण्यात येणारा गाळ उपसा.
--
१५ दिवसात १५ हजार घनमीटर गाळ उपसा

नाम फाउंडेशनचा पुढाकार ; चार ठिकाणी काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः येथील वाशिष्ठी नदीने मोकळा श्वास घेण्यासाठी नाम फाउंडेशनच्या पुढाकारातून गेल्या १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केला जात आहे. एकाचवेळी चार ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू असून १५ दिवसात १५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात यश आले आहे. अजूनही पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचा मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.
जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसासाठी तीन टप्पे तयार केले आहेत. गतवर्षीच्या पावसामुळे वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे काम काही ठिकाणी थांबले होते तर पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यातील उर्वरित तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरवात झाली. पहिल्या टप्पात ८.१० दशलक्ष घनमीटर गाळ काढून झाला आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या १० कोटीपैकी ६ कोटी निधी खर्च झाला आहे तर ४ कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सुरू असणारे काम अतिशय संथगतीने होत असल्याचे निदर्शनास येताच चिपळूण बचाव समिती पुन्हा आक्रमक झाली. या कामाला गती प्राप्त व्हावी, येत्या पावसाळ्यापूर्वी वाशिष्ठी नदीतून जास्तीत जास्त गाळ काढला जावा यासाठी पुरेपूर यंत्रसामुग्री शासनाने पुरवावी यासाठी समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत गाळ उपसा कामाचे पुढील नियोजन व महत्वाचे काही निर्णय घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील शिल्लक राहिलेला संपूर्ण गाळ नाम फाउंडेशन काढेल, अशी ग्वाही मल्हार पाटेकर यांनी दिली. त्यानुसार नाम फाउंडेशनचे ८ पोकलेन व १५ टीपर, एक ४५ मिटरचा लाँग रिच बूम दाखल झाला. या यंत्रणेच्या साहाय्याने १५ दिवस सातत्याने गाळ उपशाचे काम सुरू आहे.
शहरातील पेठमाप भाटण, बाजारपूल गणेश विसर्जन घाट, उक्ताड व गोवळकोट धक्का अशा चार ठिकाणी एकाचवेळी गाळ उपशाचे काम केले जात आहे. यामध्ये गोवळकोट धक्का येथे लाँग रिच बूमच्या साह्याने गाळ उपसा केला जातो. हे काम पूर्णतः पाण्यात असल्याने नाम फाउंडेशनची यंत्रणा कौशल्याने काम करत आहे. साधारण ८०० मीटर लांबीचा येथे बेट असून, त्यातील बहुतांशी गाळ उपसा करण्यात आला. याशिवाय उक्ताड जुवाड बेट येथे २ पोकलेन, पेठमाप २ व बाजारपूल येथे १ पोकलेन आणि जेसीबीने काम सुरू आहे.
---
गाळ पूररेषेच्या बाहेर खासगी जमिनीत
सद्यःस्थितीत वाशिष्ठी नदीतून काढलेला गाळ पूररेषेच्या बाहेर खासगी जमिनीत टाकला जात आहे. महसूल विभागाने मान्यता दिलेल्या जागेतच गाळ टाकला जात आहे. गुहागर बायपास मार्गावर दोन ठिकाणी तर कोंढे रिगल कॉलेजच्या हद्दीतही गाळ टाकण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com