रत्नागिरी- निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- निधन
रत्नागिरी- निधन

रत्नागिरी- निधन

sakal_logo
By

८६२२५

वडेवाले हरिभाऊ नरवणे यांचे निधन
रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध वडेवाले हरिश्चंद्र महादेव उर्फ हरिभाऊ नरवणे (वय ८६) यांचे निधन झाले. अत्यंत प्रामाणिक, शांत व परोपकारी वृत्तीचे हरिभाऊ अनेकांचे आधारवड होते. १९६६ मध्ये भगवती बंदर येथील जेट्टीचे काम सुरू असताना तिथे काम करणाऱ्या कामगारांना खाण्या-पिण्याची सोय जवळपास उपलब्ध नव्हती. हीच गरज ओळखून हरिभाऊंनी त्याकाळी तेथील कामगारांना चहा, वडापाव उपलब्ध करून दिला आणि पुढे हाच त्यांच्या व्यवसायाचा भाग बनला. जेट्टीचे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळपास दोन अडीच वर्षे तिथे व्यवसाय केल्यानंतर राधाकृष्ण थिएटर येथील कॅन्टीन त्यांनी भाडेतत्त्वावर चालवायला घेतले. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत असल्याने त्यांनी शिक्षकी पेशासारखी नोकरीही नाकारून व्यवसायाला प्राधान्य दिले. यामध्ये त्यांना पत्नीचीही खंबीर साथ मिळाली. गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.