दहावी परिक्षा आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी परिक्षा आजपासून
दहावी परिक्षा आजपासून

दहावी परिक्षा आजपासून

sakal_logo
By

दहावी परीक्षा आजपासून
४१ परीक्षा केंद्रे ः ९२६९ विद्यार्थी होणार प्रविष्ट
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्यापासून (ता.२) सुरू होत आहे. २५ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार असून, जिल्ह्यात यासाठी ४१ परीक्षा केंद्रे तयार केली आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली आहे. १० वी च्या परीक्षेसाठी एकूण ९ हजार २६९ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हास्तरावर एकूण ४ भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. यात जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व योजना शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये ९ परीरक्षक (कस्टडी) केंद्रे स्थापन केली आहेत. परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती स्थापन केलेली आहे.