बांदा-गवळीटेंबवाडी रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा-गवळीटेंबवाडी रस्त्याची दुरवस्था
बांदा-गवळीटेंबवाडी रस्त्याची दुरवस्था

बांदा-गवळीटेंबवाडी रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

swt126.jpg
L86238
बांदाः गवळीटेम्ब येथील रस्त्याची झालेली दुरवस्था. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांदा-गवळीटेंबवाडी
रस्त्याची दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ः बांदा-गवळीटेंबवाडी येथील भाऊ वळंजू घर ते पाटकर बाग कॉर्नर हा जवळपास १०० मीटरचा रस्ता पूर्णपणे वाहुन गेल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वेळोवेळी कल्पना देऊनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेली तीन-चार वर्षे तेथे रस्ताच अस्तित्वात नाही, अशी अवस्था आहे. रस्ता पूर्णपणे खराब होऊन केवळ खडी शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे किरकोळ स्वरुपाचे अपघात नेहमीच होत असतात. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली; पण गेली दोन वर्षे काहीच हालचाल करण्यात आली नाही. आता पावसाळा तोंडावर आल्याने रस्त्याचे काम न झाल्यास नागरिकांना ये-जा करणे देखील शक्य होणार नाही. हा रस्ता वाफोली येथील तीन वाड्यांमध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा जोडरस्ता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम त्वरित होणे गरजेचे आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम न झाल्यास येथील आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामस्थ भाऊ वळंजू, उमेश तोरस्कर, गोविंद नाईक, अर्चना आंबेलकर, श्रुती वळंजू, वैदेही देसाई, महादेव आईर, गोविंद वराडकर, गुरू कल्याणकर, अभिजीत देसाई, व्यंकटेश उरुमकर, पंकज देसाई, राजन नाईक यांनी याबाबत प्रशासनास निवेदन दिले.