Tue, May 30, 2023

दुचाकी अपघातात कुडाळात दोघे जखमी
दुचाकी अपघातात कुडाळात दोघे जखमी
Published on : 1 March 2023, 3:10 am
दुचाकी अपघातात
कुडाळात दोघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः कुडाळ-पिंगुळी रस्त्यानजीक येथील मथुरा आर्केट येथे वसतिगृहाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थिनीला दुचाकीची धडक बसली. यात विद्यार्थिनीसह दुचाकीस्वार जखमी झाला. ऋतुजा शिंदे असे विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी गणेश पालकर (वय 38, रा. पिंगुळी करमळगाळू) याच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जखमींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै महाविद्यालयामध्ये फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी वसतिगृहाच्या दिशेने जात होत्या. या दरम्यान कुडाळहून पिंगुळीच्या दिशेने जाणाऱ्या गणेश याच्या दुचाकीची (एमएच 07 एपी 7423) धडक बसली. या अपघातात विद्यार्थिनीसह दुचाकीस्वारही जखमी झाला.