समरस होऊन येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जा

समरस होऊन येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जा

kan22.jpg
86292
फोंडाघाटः येथे मार्गदर्शन करताना प्रा. मनोज निंबाळकर. प्राचार्य डॉ. विष्णू फुलझले आदी.
-----------
समरस होऊन येणाऱ्या प्रश्नांना सामोरे जा
प्रा. मनोज निंबाळकरः आजचा स्मार्टफोन हा तुमचा सोबती
फोंडाघाट, ता. २ः अभ्यासक्रमामध्ये असणारा प्रकल्प गुणांसाठी फक्त लिहू नका. आपल्या भागामध्ये असणाऱ्या साधन संपत्तीचा शोध घ्या. त्यावर संशोधन करा. त्याचा आपल्या भावी जीवनामध्ये उपयोग कसा करून घेता येईल, यासाठी आपण स्वतः त्यामध्ये समरस व्हा. समरस झाला तरच तुम्हाला तुमच्यापुढे अनेक प्रश्न निर्माण होतील. त्या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना, आपला प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल. तसेच आजचा स्मार्टफोन हा तुमचा सोबती आहे, असे मत शारदाबाई पवार महिला कॉलेज, बारामती जिल्हा, पुणे येथील प्रा. मनोज निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्यक्त केले.
आयक्यूएसी व भूगोल विभागाच्या वतीने कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे, प्रकल्प अहवाल कसा लिहावा, या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विष्णू फुलझले म्हणाले, सर्वच विषयांमध्ये आज विद्यार्थ्यांना प्रकल्प अहवाल लिहावयाचा असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचा विषय कोणता आहे, त्याला अनुसरून त्या परिसरामधील माहितीचे संकलन करा. फोटो, तक्ते, आकृत्यांची सांगड घाला, म्हणजे आपला प्रकल्प अहवाल शास्त्रीय दृष्ट्या उत्कृष्ट होईल. हा कार्यक्रम फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत, दोन महाविद्यालयांच्यावतीने ही कार्यशाळा भूगोल विभाग प्रमुख व समन्वयक डॉ. राजाराम पाटील यांनी आयोजित केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com