Wed, May 31, 2023

होळीसाठी रेल्वेच्या जादा गाड्या
होळीसाठी रेल्वेच्या जादा गाड्या
Published on : 2 March 2023, 1:01 am
होळीसाठी रेल्वेच्या जादा गाड्या
कणकवलीः कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी जादा रेल्वे गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०१५९२ मंडगाव जंक्शन ते एलटीटी या मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने वन वे स्पेशल गाडी धावणार आहे. येत्या ७ मार्च रोजी गाडी क्रमांक ०१५९२ मंडगाव ते एलटीटी वन वे स्पेशल मंडगाव जंक्शन येथून सकाळी ८.४५ वाजता सुटेल. त्याच दिवशी रात्री ९.५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल. ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे स्थानकावर थांबेल. ही गाडी १७ डब्यांची असून स्लीपरचे १५ तर २ जनरल डबे जोडले जाणार आहेत.