
विनाफटका बैलगाडा शर्यतीत दीपक पडवळ प्रथम
rat०२१७.txt
बातमी क्र..१७ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
- rat२p२१.jpg ः
८६३४०
राजापूर ः विजेत्या दीपक पडवळ यांना मानाची ढाल आणि रोख रक्कम देऊन गौरवताना मान्यवर.
- rat२p२२.jpg ः
८६३४१
स्पर्धेतील विजेत्या बैलजोडीसह दीपक पडवळ.
---
विनाफटका बैलगाडा शर्यतीत पडवळ प्रथम
१ मिनिट ९ सेंकदात केले अंतर पूर्ण ः ४८ बैलगाड्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः बैलगाडीची पिढ्यानपिढ्या घराण्याची परंपरा जपणारे तालुक्यातील ताम्हाणेचे सुपुत्र दीपक पडवळ यांनी ताम्हाणे येथील श्री ब्राह्मणदेव मित्रमंडळातर्फे आयोजित खुल्या विनाफटका बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावत विजयाचा गुलाल उधळला. पडवळ यांच्या विजेत्या बैलजोडीने १ मिनिट ९ सेंकद कालावधीत ही स्पर्धा पूर्ण केली. विजेतेपदाची ढाल आणि रोख रक्कमेचे पारितोषिक देऊन पडवळ यांच्यासह अन्य विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
बक्षीस समारंभाला मंडळाचे अध्यक्ष अनंत बेर्डे, उपाध्यक्ष रमेश चव्हाण, सचिव चंद्रकांत बेर्डे, सहसचिव बाबा राऊत, खजिनदार गणपत वाफेलकर, सहखजिनदार शिवाजी सावंत आदी उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतील ४८ नामांकित बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. ताम्हाणेचे सुपुत्र अनमंत बेर्डे यांच्या मानाच्या गाडीने या स्पर्धेचा आरंभ झाला. त्यानंतर उत्तरोत्तर रंगलेल्या या स्पर्धेमध्ये जोरजोरात घोषणाबाजी करत समर्थकांकडून आपापल्या पसंतीच्या बैलगाड्यांना प्रोत्साहित केले जात होते. या स्पर्धेसाठी ताम्हाणे पहिलीवाडी येथील समाजसेवक वामन तळेकर, मुंबईतील शिवसेना नगरसेवक वसंत नकाशे, युवासेनेचे राजापूर तालुका युवाधिकारी संदेश मिठारी, आडवली येथील बाळा नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि तुळसवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक आबा आडिवरेकर, ताम्हाणे येथील राहुल पवार यांचे रोख बक्षिसांसाठी तर स्पर्धा यशस्वीततेसाठी आमदार राजन साळवी, पाचल येथील कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल
या स्पर्धेमध्ये ताम्हाणे येथील पडवळ यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या बैलजोडीने १ मिनिट ९ सेंकद १६ पॉईंटमध्ये स्पर्धा पूर्ण केली तर स्पर्धेचे उपविजेतेपद साहील सुनील (भडकंबा, १ मिनिट १० सेंकद ७९) यांना मिळाला. विनायक जंगम (तृतीय, गाव ः कासार्डे), चंद्रकांत सावंत (चौथा क्रमांक, रा. कणकवली), मंदार करपे (पाचवा, रा. बावनळे), आकाराम कांबळे (सहावा क्रमांक, सावर्डे, कोल्हापूर) यांनी यश पटकावले.