
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 90 टन कचरा संकलित
rat०२२३.txt
बातमी क्र.. २३ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२p२.jpg-
८६२९७
रत्नागिरी ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर स्वच्छता अभियान राबवताना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य.
-
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ९० टन कचरा संकलित
रत्नागिरी, ता. ३ ः महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रत्नागिरी शहर ते कुवारबाव व चंपक मैदान रस्त्याची महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात १९५० श्रीसदस्यांनी सात किमीच्या रस्त्यावर सहा तासात ९० टन कचरा गोळा केला तसेच परिसराची स्वच्छता केली.
राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे राज्यपाल नियुक्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली. साळवी स्टॉप ते कुवारबाव व साळवी स्टॉप ते चंपक मैदान या रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर स्वच्छतेसाठी शेकडो श्रीसदस्य झाडू, फावडे, घमेली घेऊन उतरले होते. प्रतिष्ठानच्यावतीने महास्वच्छता मोहिमेचे उत्तम नियोजन करण्यात आले. शेकडो हात शिस्तीने कार्य करताना दिसत होते. हे चित्र समाजाला मार्गदर्शक व प्रेरणादायी होते.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आम्हाला राष्ट्रऋण, समाजऋणाची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे स्वच्छतामोहिमेसारख्या सेवेत कर्तव्य बजावताना आम्हाला आनंद होतो, अशा प्रतिक्रिया महास्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी श्री सदस्यांकडून येत होत्या. १९५० श्रीसदस्यांनी सात किमीचा परिसर सहा तासात स्वच्छ केला. सुमारे ९० टन कचरा गोळा करून रत्नागिरी नगर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडकडे सुपूर्द करण्यात आला. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, माजी आमदार बाळासाहेब माने, शिरगाव ग्रा. पं. सदस्य सचिन सनगरे, ग्रामविकास अधिकारी सावके यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या कार्याचे कौतुक केले.