पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथचा शिमगोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथचा शिमगोत्सव
पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथचा शिमगोत्सव

पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथचा शिमगोत्सव

sakal_logo
By

rat०२२४.txt

बातमी क्र. .२४ (टुडे पान २ साठी)

पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथचा आजपासून शिमगोत्सव

रत्नागिरी, ता. २ ः तालुक्यातील पाली पाथरटचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लिनाथ देवस्थानचा वार्षिक शिमगोत्सव उद्यापासून (ता. ३) सुरू होत आहे. श्री लक्ष्मीपल्लिनाथ देवस्थानची शिमगोत्सव नियोजनाची सभा मंदिरामध्ये देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये उत्सवाचे नियोजन करण्यात आले.
या सभेला देवस्थानचे मानकरी अनंत पालकर, गुरूराज सावंतदेसाई, प्रदीप घडशी, बबन काजरेकर, सुभाष गराटे, चंद्रकांत गुडेकर, विष्णू माईण, रोहित पांचाळ, अनिल धाडवे, गोविंद धाडवे व पाली-पाथरटमधील ग्रामस्थ उपस्थित होते. पालखीत श्रीदेव पल्लिनाथ, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी नवलाई, श्री देवी महाकाली, श्री देवी पावणाई, श्री देवी जुगाई, श्री करंबेळदेव, श्री देवी त्रिमुखी माता स्थानापन्न असतात.
शिमगोत्सवात उद्या दुपारी २ वा. देवाची पालखी सजवणे, सुशोभित करणे, देवाला रूपे लावणे, सायं. ६ वा. पूजा, धूपारती, सायं. ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत पालखी दर्शन होईल. रात्री ११.३० नंतर पालखी खेळवण्यासाठी मंदिराबाहेर प्रांगणात आणली जाईल. पहाटे होम होऊन पालखी सहाणेवर स्थानापन्न होईल. ४ मार्चला दुपारी २ वा. सहाणेवरून पालखी व गावकरी होळी आणण्यासाठी जातील. होळी उभी केल्यानंतर पूजा व रात्री ९.३० वा. होळीजवळ नवस बोलणे व फेडले जातील. रात्री १०.३० वा. पालीतील नमन होईल. ६ मार्चला दुपारी २ वा. सहाणेवरून श्रीदेव व गावकरी नेमलेल्या ठिकाणाहून श्रींची कोकड होळी सायं. ६ वा. घेऊन येतील. रात्री ९ ते १० वा. श्रींची कोकड होळी गुलालाची उधळण करत नाचवत खेळवली जाईल. रात्री १० वा. पौर्णिमेचा होम होईल व होळीच्या शेंड्याजवळ नवस बोलणे व फेडणे कार्यक्रम होईल. रात्री १०.३० वा. पाथरटचे नमन होईल. ७ मार्चला धुळवडीसाठी ढोल व निशाण जाईल. १२ मार्चला रंगपंचमीला सहाणेवर बैठकीत शिंपणे होईल. त्यानंतर श्री लक्ष्मीपल्लिनाथांचे ज्या ठिकाणी प्रथम आगमन झाले त्या देवाचा आंबा (देवतळे) येथे श्री देवाची पालखी जाईल व गावाची पूजा स्वीकारेल.
२३ मार्चला होणार सांगता
२२ मार्चला गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी पालखीची ग्रामफेरी पूर्ण होऊन गादीवर मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई (खोत) यांच्या घरी पालखी वस्तीला राहील. त्या वेळी गादीवरची पूजा, सव्वाशेराचा महानैवेद्य महाप्रसाद होईल. २३ मार्चला गादीवरची गावाची बैठक व गाऱ्‍हाणं होऊन तेथून ढोलताशांच्या गजरात पालखी मंदिरात येईल व गावाचे गाऱ्हाणे होऊन घाट धूपारतीने पूजा उत्सवाची सांगता होईल.