''कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स''ची रविवारी झारापला सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स''ची रविवारी झारापला सभा
''कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स''ची रविवारी झारापला सभा

''कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स''ची रविवारी झारापला सभा

sakal_logo
By

‘कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स’ची
रविवारी झारापला सभा
प्रदर्शनात वेगवेगळ्या मशिनरींचे २६ स्टॉल
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ः महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ५) झाराप, नेमळे ब्रीजजवळ हॉटेल आराध्य (कुडाळ) येथे आयोजित केली आहे.
या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशिनरीचे २६ स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. या सभेस कर्नाटक कॅश्यू असोसिएशनचे आजी-माजी चार अध्यक्ष, गोवा तसेच ओरिसा कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्षांसह महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील काजू संघटना मजबूत होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
माजी खासदार नीलेश राणे यांनी काजू उद्योगाच्या थकित कर्जाच्या पुनर्रचनेबाबत व काजू उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्य तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभागाने शासन निर्णय काढून राणे यांनी केलेल्या विविध शिफारशींवर कार्यवाही करण्याबाबत अध्यादेश जारी केला होता. यावर शासनाकडून झालेल्या कार्यवाहीमुळे काजू उद्योग व उत्पादकांना न्याय मिळाल्याने नीलेश राणे यांचे महाराष्ट्र कॅश्यू असोसिएशनने आभार मानले.