''वेंगुर्ले''च्या विकासासाठी प्रयत्नशील

''वेंगुर्ले''च्या विकासासाठी प्रयत्नशील

swt२१०.jpg
८६३४५
वेंगुर्लेः येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर यांचा सत्कार करताना शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी रवींद्र परब.

‘वेंगुर्ले’च्या विकासासाठी प्रयत्नशील
उमेश येरम ः दशावतार नाट्यमहोत्सवाची उत्साहात सांगता
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यासह शहरात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यापुढेही त्यांच्या माध्यमातून या भागातील समाजाभिमुख विकासकामे अधिक जोमाने करण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरात वॉर्ड निहाय दोन पुरुष व दोन महिलांची नेमणूक केली जाणार असून त्यांनी सुचविलेली विकासकामे त्या त्या वॉर्डमधील नागरिकांशी चर्चा करून पूर्णत्वास नेणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी दशावतार नाट्यमहोत्सव समारोप प्रसंगी केले.
श्री देवी सातेरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, वेंगुर्ले यांच्यावतीने आयोजित व शिक्षणमंत्री केसरकर पुरस्कृत नाट्य महोत्सवाचे आयोजन सातेरी मंदिरच्या पटांगणावर भव्य दशावतार केले होते. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजन खांडेकर, देवस्थान ट्रस्टचे रवींद्र परब, मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक प्रकाश मोर्ये, सातेरी कला, क्रीडा मंडळाचे सुनील परब, बाळा परब, रमण परब, प्रकाश परब, अशोक परब, प्रदीप परब, मंगेश परब, नीतेश परब, उमेश परब, राजू परब आदी उपस्थित होते. सात दिवस चाललेल्या या नाट्य महोत्सवात ज्या दशावतार मंडळांनी नाट्यप्रयोग सादर केले, त्या मंडळांच्या संचालकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शहरात चांगली सेवा देणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पवार-माने, फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. खांडेकर यांनाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या नाट्यमहोत्सवास शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नाट्यमहोत्त्सव यशस्वी करण्यासाठी श्री देवी सातेरी कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. देवस्थानचे ज्येष्ठ मानकरी हरी उर्फ काका परब यांच्यासह इतर मानकऱ्यांचे यावेळी आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश परब यांनी केले. या समारोप प्रसंगी मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे-कुडाळ यांचा ''अकल्पासूर वध'' हा नाट्यप्रयोग झाला. या नाट्यमहोत्सवासाठी तालुक्यातील नाट्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com