रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल विजेती

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल विजेती

86349
कुर्ली ः येथे स्पर्धेचे उद्‍घाटन करताना मान्यवर.

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल विजेती
कुडाळ ः कुर्ली-घोणसरी (ता.वैभववाडी) येथील खुल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कुर्ली सुपर डान्सरची मानकरी पिंगुळी-कुडाळची मृणाल सावंत ठरली. कुर्ली शिवमहोत्सव आयोजन समितीतर्फे खुल्या जिल्हास्तरीय सुपर डान्सर रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले होते. माजी सरपंच नलिनी पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, वैभववाडी उपसभापती अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते. स्पर्धेत दुतीय दीक्षा नाईक, तृतीय शंकर गवस, उतेजनार्थ समर्थ गवंडी, नेहा जाधव, आरव आईर यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे बक्षिसे, शिवचषक देऊन सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वकृत्व, निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com