चिपळूण ः हत्तीमाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  हत्तीमाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारा
चिपळूण ः हत्तीमाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारा

चिपळूण ः हत्तीमाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारा

sakal_logo
By

- ratchl२१.jpg ःKOP२३L८६३४३ चिपळूण ः खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभाकर जाधव सोबत पदाधिकारी, कार्यकर्ते.
------------
हत्तीमाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हवे

रिपब्लिकन पार्टी ; खासदार तटकरेंना निवेदन

चिपळूण, ता. २ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १३ व १४ एप्रिल १९२९ ला चिपळूण (आताची खेर्डी) येथील हत्तीमाळावर खोती पद्धती विरोधी आणि शेतकऱ्यांविषयी अशा दोन ऐतिहासिक परिषदा झाल्या. बाबासाहेबांनी खोतीविरुद्ध कायदा करून खोती पद्धतीला मूठमाती देऊन शेतकऱ्यांना खोतीच्या गुलामगिरीतून मुक्त केले. अशा या हत्तीमाळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्मारक शासनाकडून उभारले जावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) या पक्षाच्यावतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे निवेदनाद्ववारे केली.
काही दिवसांपूर्वी खासदार तटकरे चिपळुणात आले होते. या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कांबळे) या पक्षाच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. हत्तीमाळावर झालेल्या दोन्ही परिषदांना कोकणातील हजारो शेतकरी उपस्थित होते. या परिषदा एका धर्माच्या, जातीच्या नावाने नव्हत्या तर कोकणातील सर्व शेतकरीवर्गासाठी होत्या. या सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण अत्यंत स्फूर्तिदायक व स्वाभिमान जागृत करणारे होते. स्वावलंबन व स्वाभिमानाशिवाय तरणोपाय नाही, असा संदेश बाबासाहेबांनी हजारो शेतकरी बांधवांना दिला. खोतीविरुद्ध कायदा करून खोती पद्धतीला मूठमाती देऊन शेतकऱ्यांना खोतीच्या गुलामगिरीतून मुक्त केले. हत्तीमाळावरील संपूर्ण जागा शासनाने मिळवावी, त्या जागेवर शासनाने त्यांच्या पैशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्मारक उभारावे, स्मारकाचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. खासदार तटकरे यांच्यासोबतच आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम आदी मान्यवरांनाही निवेदन देण्यात आली. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना हे ऐतिहासिक कार्य आम्ही पूर्ण करू, असे आश्वासन खासदार तटकरे यांनी दिले.