चिपळूण-अतिक्रमणाविरोधात चिपळूण पालिका अॅक्शन मोडवर

चिपळूण-अतिक्रमणाविरोधात चिपळूण पालिका अॅक्शन मोडवर

फोटो ओळी
-rat2p27.jpg-KOP23L86374
चिपळूण ः रस्त्यावर होणारी अतिक्रमणे आणि गाड्यांचे पार्किंग यामुळे पादचाऱ्यांसह वाहने चालविण्यातही अडथळे येत आहेत.
--------
अतिक्रमणाविरोधात चिपळूण पालिका अॅक्शन मोडवर
वाहतूक कोंडीचा त्रास; हातगाडीधारक, व्यावसायिकांना आठवड्याची डेडलाईन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात आक्रमक पाऊल उचलत मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने हातगाडीधारक व व्यावसायिकांना आपापली अतिक्रमणे येत्या आठ दिवसांत हटवण्याच्या सूचनावजा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील बहादूरशेख नाका ते मच्छी मार्केट व चिंचनाका ते पाग पॉवरहाऊस या पालिकेच्या मुख्य रस्त्यावर तसेच पानगल्ली व अन्य बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणी हातगाडीधारक व अन्य व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहनचालक, पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शिमगोत्सव सुरू झाला आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह विविध शहरातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी चिपळूण तालुक्यात दाखल होत आहेत.
चिपळूण शहरातील बाजारपेठ ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने येथे सर्वच सण-उत्सव काळात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर हातगाडीधारकांचे व अन्य व्यावसायिकांच्या वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होणार आहे.
संपूर्ण बाजारपेठेमध्ये व्यापारी गाळ्यांसमोर मोठ्या प्रमाणात शेड उभारलेल्या आहेत. या दुकानांसमोरील शेड पालिकेच्या रस्त्यापर्यंत असल्यामुळे शहरात येणाऱ्या ग्राहकांची वाहने, व्यापारी व नोकरदार यांची वाहनेदेखील पालिकेच्या रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. व्यापारी गाळे व दुकानांसमोर वेदरशेड नियमाप्रमाणे लटकत्या (हँगिंग) स्वरूपाची उभारणे अपेक्षित होते. तरी या शिमगोत्सवात वाहनचालकांस व नागरिकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी व नागरी दळणवळणाची व्यवस्था सक्षमीकरण करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. दुकानदार, व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर अनधिकृत शेड स्वखर्चाने येत्या आठ दिवसांत हटवाव्यात अन्यथा पालिकेमार्फत अतिक्रमणाची कारवाई करण्यात येईल, अशा सूचना मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी चिपळुणातील हातगाडीधारक, टपरीधारक, व्यावसायिक, दुकानदार यांना दिल्या आहेत. या संदर्भातील एक नोटीस चिपळूण व्यापारी महासंघटनेचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनाही देण्यात आली आहे.

कोट
शिमगोत्सवात शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यातच रहदारीच्या रस्त्यावर हातगाडी लावल्यास वाहतूक कोंडी होण्यास मदत होते. शिमगोत्सवात वाहतूक कोंडीचे प्रकार घडू नयेत. रस्त्यावरच दुकाने थाटली जाऊ नयेत यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
--प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com