
न्हावेलीत शॉर्टसर्किटने काजू बागायतीस आग
swt212.jpg
86359
न्हावेलीः रेवटेवाडी येथे जळालेली काजू बाग. (छायाचित्रः नीलेश मोरजकर)
न्हावेलीत शॉर्टसर्किटने
काजू बागायतीस आग
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः न्हावेली-रेवटेवाडी येथील काजू बागेत विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन सुमारे एक एकरवर काजू बागेला आग लागली. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली. महावितरणचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्ण वाहिन्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप काजू बागायतदार प्रसाद हळदणकर यांनी केला.
रेवटेवाडी येथील शशिकांत हळदणकर यांच्या काजू बागेस आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोट लांबून दिसल्यामुळे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात विद्युत खांब व जीर्ण वाहिन्या महावितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष केल्यानेच आपल्या बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली, असा आरोप शशिकांत हळदणकर यांनी केला. या आगीत सुमारे पंचवीस झाडे जळाली असून 50 हजारांचे नुकसान झाले. प्रशासनाने आमचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व झालेली नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू बागायतदार हळदणकर यांनी केली आहे.