महिला-बाल रुग्णालय बांधकाम निधी मंजूर करा

महिला-बाल रुग्णालय बांधकाम निधी मंजूर करा

swt२१३.jpg
८६३७७
मुंबईः आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देताना राजन तेली.

महिला-बाल रुग्णालय
बांधकाम निधी मंजूर करा
राजन तेलीः आरोग्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा-२ साठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी निवेदन दिले आहे. मंत्र्यांनी तात्काळ उचित कारवाई करावी, असे सचिवांना आदेश दिले आहेत.
श्री. तेली यांनी निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागाने २०१३-१४ मध्ये जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम करण्याकरीता १४ कोटी एवढ्या रक्कमेला मान्यता दिली होती. रुग्णालयाचे सर्व बांधकाम हे मूळ आराखड्यानुसार झाले नसल्याने बांधकाम विभागाने २३ कोटी रकमेचे टप्पा-२ बांधकामाचे अंदाजपत्रक शासनाने २०१८-१९ या वर्षात सादर केले होते. परंतु, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या कामाला प्रशासकीय मान्यता व निधी प्राप्त झाला नसल्यामुळे रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्याचे समजते. त्यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा- २ बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व २३ कोटी निधी या वर्षात मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्याकडे वर्ग करण्याकरिता सहकार्य करावे. जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग हे जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ सिंधुदुर्ग येथे कार्यरत करण्यास शासनाने मान्यता द्यावी. जेणेकरून कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती असलेल्या कुडाळ या ठिकाणी जिल्हा रुग्णालय सुरु राहील. जनतेच्या सोयीकरीता वरील मागण्याचा विचार करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com