साळगावात उद्या धार्मिक कार्यक्रम

साळगावात उद्या धार्मिक कार्यक्रम

साळगावात उद्या धार्मिक कार्यक्रम
कुडाळः तालुक्यातील साळगाव येथील परमपूज्य काका खानोलकर महाराज यांचा १४० वा जयंती उत्सव तेथीलच समाधी मंदिरात शनिवारी (ता. ४) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजा तसेच सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत प. पू. नामदेव महाराज भक्त मंडळी (सिंधुदुर्ग) यांचा ''दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा''चा अखंड नामस्मरण कार्यक्रम, दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद व रात्री भजनांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीप्रकाश (अरविंद) प्रभुखानोलकर यांनी केले आहे.
.............
''कर्णबधिरता'' सप्ताहात सहभागाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः जागतिक कर्णबधिरता दिन ३ मार्चला साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा रुग्णालयामार्फत १ ते ८ मार्च या कालावधीत कर्णबधिरता सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कर्णबधिरता सप्ताहात जिल्हा रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत कर्णबधिर रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ० ते १८ वर्षे वयोगटातील शालेय मुलांची तपासणी, प्रभातफेरी काढली जाणार आहे. सर्व संबंधितांनी कर्णबधिरता सप्ताहामध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आले आहे.
..............
समुपदेशकपदी भीमराव येडगे
देवगडः महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा कालावधीसाठी विभागीय मंडळ स्तरावर समुपदेशक म्हणून शेठ म. ग. हायस्कूल, देवगडचे शिक्षक भीमराव येडगे यांची नियुक्ती करण्यात आली. दहावी व बारावी परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यात ताणतणाव व दडपण निर्माण झाल्यास तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने व त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी शंका निरसन होण्यासाठी येडगे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी येडगे यांच्याशी संपर्क साधावा.
...............
केळुसला आज दशावतार नाटक
वेंगुर्लेः केळुस येथील पावसकर दुकान येथे उद्या (ता. ३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रात्री ९ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. नाट्यरसिक व केळुस ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com