उमाबाई बर्वे ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमाबाई बर्वे ग्रंथालयात
ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद
उमाबाई बर्वे ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद

उमाबाई बर्वे ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद

sakal_logo
By

86422
देवगड ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

उमाबाई बर्वे ग्रंथालयात
ग्रंथप्रदर्शनास प्रतिसाद
देवगड, ता. २ ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथालयाने खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
ग्रंथालयाच्या आजीव सभासद व ग्रंथप्रेमी शुभदा बोडस यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला व सरस्वती देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोडस यांनी, जगातील प्रमुख भाषांमध्ये मराठी एक संपन्न अशी भाषा आहे. रोजच्या व्यवहारात मराठी भाषा बोलली जावी. आपल्या बोलीभाषेत दुसऱ्या भाषेतील शब्दांचा वापर न करता जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करावा. आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा. ग्रंथालयातील मराठीतील विविध पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे आदी विपुल साहित्याचा लाभ घ्यायला हवा, असे सांगून राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ काव्यसंग्रहातील काही कवितांचे वाचन करून ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ ही प्रार्थना म्हटली. ग्रंथालयाचे सचिव संजय धुरी यांनी ‘फक्त लढ म्हणा’ कवितेचे वाचन केले. मंदाकिनी गोडसे यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिला. बोडस यांनी ग्रंथालयाला एक हजाराची देणगी दिली. ग्रंथालय अध्यक्ष सागर कर्णिक यांनी आभार मानले. उपाध्यक्ष रणजित हिर्लेकर, संचालक सदस्य दत्तात्रय जोशी, नारायण गोगटे तसेच वाचक उपस्थित होते.