
राष्ट्रीय विज्ञान दिन तळवडे येथे उत्साहात
swt221.jpg
86424
तळवडे ः विज्ञान प्रतिकृतींचे उद्घाटन करताना प्रा. शृंगारे. सोबत मुख्याध्यापक अजय बांदेकर, श्री. भालेकर आदी.
राष्ट्रीय विज्ञान दिन
तळवडे येथे उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ः गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरिअल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते भारतीय शास्त्रज्ञ नोबेल विजेते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी व्यासपीठावर सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी कॉलेजचे प्राध्यापक शृंगारे, श्री. भालेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर, विज्ञान विषयाच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती देसाई, श्रीमती तांबे आदी उपस्थित होते.
विज्ञान विषय शिक्षिका श्रीमती देसाई यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शृंगारे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून समाजामध्ये वाढत चाललेली अंधश्रद्धा दूर करणे काळाची गरज आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून अनावरण करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरल्या. मुख्याध्यापक बांदेकर यांनी विज्ञानाचे आपल्या जीवनातील स्थान व महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या संचालिका मैथिली नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन शिक्षिका तांबे यांनी केले. शिक्षिका प्रणिता मयेकर यांनी आभार मानले.