बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ

बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ

86426
बांदा ः येथे रस्ता कामाचा प्रारंभ करताना सुधीर साटेलकर. शेजारी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब आदी.

बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ
बांदा ः शहरातील श्री देव बांदेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर साटेलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. १५ वा वित्त आयोग निधीतून १ लाख ८५ हजार रुपये खर्चून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळु सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, माजी सरपंच दीपक सावंत, नाना सावंत, साई धारगळकर, शैलेश केसरकर, सर्वेश मुळ्ये आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
----------
लोकशाहीदिन सोमवारी
सिंधुदुर्गनगरी ः मार्च महिन्यातील लोकशाहीदिन महिन्याच्‍या पहिल्या सोमवारी (ता. ६) दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com