राज्य कबड्डी स्पर्धेत ‘युवा फलटण'' मुंबई विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य कबड्डी स्पर्धेत ‘युवा फलटण'' मुंबई विजेता
राज्य कबड्डी स्पर्धेत ‘युवा फलटण'' मुंबई विजेता

राज्य कबड्डी स्पर्धेत ‘युवा फलटण'' मुंबई विजेता

sakal_logo
By

rat०२२८.TXT

बातमी क्र.. २८ (पान २ साठी)

फोटो ओळी
- rat२p२४.jpg-
८६३६५
रत्नागिरी ः राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम विजेत्या युवा फलटण मुंबई शहरच्या संघासमवेत मान्यवर व मंडळाचे सदस्य.
-----------------
राज्य कबड्डी स्पर्धेत ‘युवा फलटण'' मुंबई विजेता

मिरजोळेत आयोजन ः मुंबईतील मध्यरेल्वे उपविजयी

रत्नागिरी, ता. २ ः शहराजवळील मिरजोळे येथे आई कालिका क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२३ स्व. उत्पल उर्फ भाई पाटील स्मृती चषकाचा मानकरी मुंबई शहरची ‘युवा फलटण'' तर उपविजेता मुंबईतील मध्यरेल्वे हा संघ ठरला.
मिरजोळे येथे आई कालिका क्रीडा मंडळाच्यावतीने ही राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२३ नुकतीच पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामना मुंबई शहरचा संघ युवा फलटण विरुद्ध मध्यरेल्वे या संघांमध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या रंगलेल्या या सामन्यात युवा फलटण या संघाने विजेता हा मान पटकावला. या स्पर्धेत तृतीय कमांकाचा मानकरी विजेता संघ बँक ऑफ बडोदा मुंबई शहर तर चौथा क्रमांक महिंद्रा अॅण्ड महिंद्रा संघाने पटकावला. उत्कृष्ट चढाई युवा फलटणचा शुभम शेळके, उत्कृष्ट पकड युवा फलटणचाच साईराज पाटील तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मध्यरेल्वेचा अजिंक्य पवार याने पटकावला. पारितोषिक वितरण माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा परिषद सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, गजेंद्र पाथरे, माधवी माने, स्नेहल पाटील, उत्तम पाटील, स्वामी बाळ सत्यधारी महाराज, संदीप उर्फ बावा नाचणकर, शरद पाटील, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील, दत्तू कीर, संदेश वाडकर आदी उपस्थित होते.

नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग
अनेक राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कबड्डी खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले. राष्ट्रीय स्तरावर खेळवल्या जाणाऱ्या कबड्डी लिग या स्पर्धेत शुभम शिंदे, स्वप्नील शिंदे, अजिंक्य पवार, अस्लम इनामदार, मोहिते, लांडगे, साईराज पाटील, शुभम शेळके या सारख्या अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा संघामध्ये होता. त्यामुळे या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी रत्नागिरीतील क्रीडा रसिकांना लाभली.