कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा मुंबईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा मुंबईत
कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा मुंबईत

कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा मुंबईत

sakal_logo
By

rat०२३६.TXT

बातमी क्र.. ३६ (पान २ साठीमेन)

फोटो ओळी
- rat२p३१.jpg-
८६४२७
रत्नागिरी ः पेटीमध्ये भरलेला आंबा.
--
कोकणातून साडेसात हजार पेटी आंबा मुंबईत

गतवर्षीपेक्षा अधिक आवक ; रत्नागिरीतून २० टक्के पेट्यांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक वाढली आहे. या आठवड्यात दररोज अकरा हजारपेक्षा अधिक पेट्या दाखल होत आहेत. त्यातील साडेसात हजार पेट्या कोकणातील असून, रत्नागिरी जिल्ह्यातील २० टक्के पेट्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील आंब्याची आवक १५ मार्चनंतर वाढेल, असा अंदाज आहे. सध्या २ हजार रुपयांपासून ६ हजार रुपयांपर्यंत पाच डझनच्या पेटीचा दर आहे.
मुंबईसह आजुबाजूच्या परिसरामध्ये आंब्याची विक्री वाशी बाजार समितीमधून केली जाते. त्यामुळे कोकणातील सर्वाधिक आंबा हा वाशीतच पाठवला जातो. गेल्या काही वर्षात कोरोनामुळे थेट विक्रीवर भर दिला जात असला तरी अजूनही मोठा बागायतदार दलालांवरच अवलंबून आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस देवगडमधून मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात रवाना झाला. तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांचे प्रमाण कमी आहे. चालू आठवड्यामध्ये सलग ४ दिवस ११ हजाराहून अधिक पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या. गुरुवारी (ता. २) सकाळी आलेल्या अहवालानुसार, ७ हजार ४३४ पेटी कोकणातून तर ४ हजार ३०१ पेटी इतर राज्यातून वाशीत दाखल झाली. कोकणातून आलेल्या पेट्यांपैकी ८० टक्के देवगडमधून तर उर्वरित २० टक्के रत्नागिरीतून आल्याचे बाजार समितीमधून सांगण्यात आले. गतवर्षी मार्चच्या सुरवातीला दीड हजार पेटी वाशीत येत होती तसेच यंदा फेब्रुवारीमध्येच आंबा दाखल झाला. त्यात सर्वाधिक देवगडचाच होता. ४ ते ८ डझनाची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जाते. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे.
--
कोट
वाशीतील आवक सध्या वाढू लागली आहे. या महिन्यात त्यात अजून वाढ होईल. त्यामुळे आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल, अशी चिन्हे आहेत. आवक वाढत राहिली तर दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. सध्या हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत आहे.
- संजय पानसरे, संचालक बाजार समिती
----
आखाती देशात निर्यात सुरू
वाशी बाजारात येणाऱ्या पेट्यांपैकी ५० टक्के माल आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. यंदा लवकर आंबा आखातात पाठवण्यास सुरवात झाली आहे. सुमारे पाच हजाराहून अधिक पेट्या निर्यात होत आहेत. अन्य देशांमधील निर्यातही वेगाने वाढणार आहे.