फणसगावात मराठी भाषा गौरव दिन

फणसगावात मराठी भाषा गौरव दिन

86438
फणसगाव ः प्रा. अनुश्री नारकर यांचे स्वागत करताना मान्यवर.

फणसगावात मराठी भाषा गौरव दिन
तळेरे : फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. या कार्यक्रमात मराठीतील विविध प्रकारचे साहित्य, मराठी भाषेचा इतिहास आणि मराठीचा वारसा जपण्याची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला ३५ विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येकाने मराठी भाषेबद्दलची आत्मीयता आपल्या मनोगतात मांडली. महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुश्री नारकर यांनी अध्यक्षीय भाषणात कुसुमाग्रजांच्या काही कविता आणि मराठी भाषेतील विविध साहित्यिकांचे योगदान सांगितले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. मराठी विभाग प्रमुख प्रा. जान्हवी नारकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी मानसी नारकर हिने सूत्रसंचालन केले. दर्शना मठकर हिने आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com